बक्षीस वितरण संपन्न
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित कै.शामलाताई बिडकर इंग्लिश मीडियम स्कूल मुल्हेर शाळेचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांच्या जन्म दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
जनता विद्यालय मुल्हेर चे प्राचार्य श्री नंदन सर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर संस्थेचे संचालक श्री अनिल पंडित भाऊसाहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा उपक्रम आयोजित करण्यात आले होते, यात विशेष नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कै. शामलाताई बिडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री विसपुते सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री जाधव सर तसेच विद्यालयाचे आणि इंग्लिश मीडियम चे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.